Posts

गुढीपाडवा

Image
   गुढीपाडवा       गुढीपाडवा   हा एक भारतीय सण असून तो   हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे   चैत्र शुद्ध प्रतिपदेला   महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा   हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या   साडेतीन मुहूर्तांपैकी   हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच   राम   जन्मोत्सवाच्या  कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.              या दिवशी  महाराष्ट्रात  लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर  गुढी  उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.    ...