आरोग्याच्या दृष्टीने महत्व – Importance of Gudi Padwa in Marathi

 

        चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे.

        कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले आहे.

        गौतमीपुत्राची सत्ता असलेली राज्य कर्नाटक व आंध्रप्रदेश मधे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद साजरा करण्याकरता या दिवशी संवत्सर पाडवो व उगादी (Ugadi) या निराळया नावांनी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.











Comments