पुराणातील कथा – Gudi Padwa Pauranik Katha

 

        पुराणात लिहुन ठेवल्यानुसार एका शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्याकरता सहा हजार मातिचे पुतळे बनविले आणि त्यात प्राण फुंकले. यांच्या सहाय्याने शंकराचा पराभव करण्यात आला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू होण्याची परंपरा तेव्हांपासुनच सुरू झाली.

        देवी पार्वतीचा आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याची देखील कथा आहे. पाडव्यापासुन लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. पाडव्याच्या दिवशी देवी पार्वतीची आदिशक्तीची पुजा करण्याची देखील प्रथा आहे. त्याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात.

अशी उभारतात गुढी – Gudi Padwa Puja Vidhi

        शुभशकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल), गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंनी ही गुढी सजवली जाते.

        या गुढीच्या भवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते, तिच्याकरता पाट मांडला जातो, गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो, निराजंन उदबत्ती लावुन औक्षवण केले जाते. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकु अक्षता वाहुन गुढी उतरवली जाते.


Comments